देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच HCच्या न्यायाधीशांविरोधात होणार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 10:53 AM2019-07-31T10:53:35+5:302019-07-31T10:53:50+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

hief Justice Lets CBI Probe High Court Judge For Corruption | देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच HCच्या न्यायाधीशांविरोधात होणार गुन्हा दाखल

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच HCच्या न्यायाधीशांविरोधात होणार गुन्हा दाखल

Next

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (प्रिवेंशन ऑफ करप्शन ऍक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडणार आहे. जेव्हा सीबीआय एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सीबीआयला परवानगी देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.

न्यायाधीश शुक्ला यांच्यावर उत्तर प्रदेशमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पदाचा दुरुपयोग करत घोटाळा करण्याचा आरोप आहे. खासगी मेडिकल कॉलेजला लाभ पोहोचवण्यासाठी न्यायाधीश शुक्ला यांनी 2017-18मध्ये प्रवेशाचा काळ वाढवला होता. न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या या निर्णयाला 2018मध्ये स्थगिती देण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जूनमध्ये पत्र लिहून महाभियोगाचा वापर करून न्यायाधीश शुल्का यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. 

Web Title: hief Justice Lets CBI Probe High Court Judge For Corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.