आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अ‍ॅलर्ट

By admin | Published: October 1, 2016 03:59 AM2016-10-01T03:59:04+5:302016-10-01T03:59:04+5:30

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस

High alert across the country, suicide alert | आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अ‍ॅलर्ट

आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अ‍ॅलर्ट

Next

- हरीश गुप्ता/ शीलेश शर्मा /सुरेश डुग्गर, नवी दिल्ली

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस निर्णायक असू शकतात, या शक्यतेमुळे संरक्षण खाते आणि केंद्रीय गृह खाते सक्रिय झाले असून, या काळात सर्व राज्यांना दक्षतेच्या व खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरील भागांत आणि गावांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भारतीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलांची जागा लष्कराने घेतली आहे.
पाकिस्तानकडून थेट युद्धाची शक्यता नसली तरी काही कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेत, पाकच्या कोणत्याही कारवायांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला आणि सीमेवरील भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती करून घेतली. सीमेवरील गावे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी शेती, जनावरे यांना सोडून लोक अन्यत्र स्थलांतर करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. महिला, मुली व लहान मुले यांना मात्र अन्यत्र स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले असून, ठिकठिकाणी त्यांच्यासाठी (पान ११ वर)

आता आम्ही भारतात घुसून हल्ला करू
भारताने केलेली कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राइक असल्याचे सांगण्यात येत असले तरी खरे सर्जिकल स्ट्राइक आम्ही भारतात घुसून करून दाखवू, अशी
धमकी सईद हफिज याने दिली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय, पाक लष्कर वा तेथील सरकार यांच्या सहकार्य व मदतीशिवाय तो काही करू शकत नाही. त्यामुळे तो जे बोलला, त्याला पाकिस्तानचीच फूस असावी, असा अंदाज आहे.
आता सर्जिकल स्ट्राइक करण्याची संधी आम्हाला आहे आणि तुम्हाला अमेरिका वा कोणताही देश मदत करणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच त्याने दिली आहे.

गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवा
देशभर उद्या, शनिवारपासून नवरात्रौत्सव सुरू होत असल्याने रेल्वे स्टेशन्स, मार्केट्स, महत्त्वाची व संवेदनशील आस्थापने, कार्यालये, धार्मिक तसेच पर्यटन स्थळे अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये याची काळजी घेण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे.

मोदींची पंतप्रधानांसारखी पहिली कृती : सर्जिकल हल्ला केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. मोदींनी अडीच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानपदाला साजेशी कृती केली. जेव्हा पंतप्रधान देशाचे पंतप्रधान म्हणून काम करतात तेव्हा मीदेखील त्यांचे समर्थन करतो, असे ते म्हणाले

Web Title: High alert across the country, suicide alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.