दिल्लीमध्ये अतिदक्षतेचा इशारा
By Admin | Published: January 3, 2016 04:20 PM2016-01-03T16:20:19+5:302016-01-03T16:20:19+5:30
आपला जुना दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - आपला जुना दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
जैशचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याचे वृत्त असून, ते पठाणकोटप्रमाणे मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणू शकतात असा इशारा गुप्तचरयंत्रणांकडून मिळाला आहे. जैशकडून नागरीकांना ओलीसदेखील ठेवले जाऊ शकते. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.
दिल्लीमध्ये पर्यटन स्थळ, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तासाठी दिल्ली पोलिसांना अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.
रविवारी सकाळी बॉम्बच्या अफवेमुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सुरक्षा तपासणी करावी लागली. त्यावेळी अनेक रेल्वे गाडया थांबवण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०१५ मध्ये दिल्ली पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाकडून दहशतवादी हल्ला होऊ शकतो म्हणून एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी संपूर्ण दिल्ली शहराला अतिदक्षेतचा इशारा देण्यात आला होता.