घुसखोरीत वाढ झाल्याने हाय अलर्ट

By Admin | Published: November 30, 2015 01:06 AM2015-11-30T01:06:26+5:302015-11-30T01:06:26+5:30

पाकिस्तानी सीमेतून होणारी घुसखोरी वाढल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेलगत लष्कराला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

High alert due to intruder increase | घुसखोरीत वाढ झाल्याने हाय अलर्ट

घुसखोरीत वाढ झाल्याने हाय अलर्ट

googlenewsNext

श्रीनगर/नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमेतून होणारी घुसखोरी वाढल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेलगत लष्कराला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांनी गेल्या दहा आठवड्यांत किमान २० ते २५ कट्टर दहशतवादी भारतात पाठविल्याची माहिती आहे.
पाकव्याप्त काश्मिरातून होणारी घुसखोरी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे आणि उत्तर काश्मिरात दहशतवादी आपला तळ स्थापन करू पाहत असल्याचे कुपवाडा जिल्ह्यात गेल्या आठ आठवड्यांत घडलेल्या दहशतवादी कारवायांवरून स्पष्ट होते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: High alert due to intruder increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.