अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने काश्मीरमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 10:01 PM2018-06-01T22:01:50+5:302018-06-01T22:01:50+5:30

पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे.

High alert issue in Kashmir with the possibility of terror attacks | अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने काश्मीरमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी

अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने काश्मीरमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला पाकिस्तानातून घुसखोरी करणारे हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. हे प्रकार 'हिट अ‍ॅण्ड रन'सारखे म्हणजे हल्ला करून लगेच पळून जाण्याचे असू शकतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही माहिती मिळताच लष्कर तसेच सर्वच सुरक्षा दले अतिशय सावध झाली आहेत. पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. गस्ती पथके, पोलिसांच्या तसेच सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची सर्व महत्त्वाची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्याची घोषणा केली होती. मात्र अतिरेक्यांनी हल्ले केल्यास त्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे. जवानांच्या गस्ती पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी बुधवारी खातमा केला होता.



 

 

Web Title: High alert issue in Kashmir with the possibility of terror attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.