कथुआमध्ये अतिदक्षतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:55 AM2018-05-15T06:55:36+5:302018-05-15T06:55:36+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्यानंतर जम्मू भागात अति दक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्यानंतर जम्मू भागात अति दक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
पंतप्रधान मोदी १९ मे रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कथुआ जिल्ह्यात सीमेजवळ लोकांच्या एका गटाच्या संशयास्पद हालचाली दिसताच रात्री बारा वाजल्यापासून त्या भागात अति दक्षतेचा इशारा दिला आहे, असे हा अधिकारी म्हणाला. कथुआ, सांबा व जम्मूतील महामार्गांवरील सुरक्षा तळांना दक्षतेचा इशारा दिला गेला आहे तसेच सुरक्षा यंत्रणांनाही सावध राहण्यास सांगितले आहे.
कथुआ जिल्ह्यातील तारनाह अल्ला भागात संशयित अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्या असून हा भाग आंतरराष्ट्रीय सीमेला खूप जवळ आहे. (वृत्तसंस्था)