जवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:11 AM2018-09-20T03:11:04+5:302018-09-20T03:11:37+5:30
सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.
जम्मू/नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.
नरेंद्र सिंह हे जम्मू भागात बेपत्ता होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर तैनात असलेल्या १९२ कि.मी. लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० कि.मी. लांबीच्या नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. नरेंद्र सिंह यांची अत्यंत निर्घृण हत्या मंगळवारी रामगढ सेक्टरमध्ये करण्यात आली.
नरेंद्र सिंह यांचा उल्लेख यापूर्वी सीमा सुरक्षा दलाकडून नरेंद्र कुमार असा झाला होता. नरेंद्र सिंह यांच्या अंगावर बंदुकीच्या तीन गोळ्यांच्या जखमा व त्यांचा गळा चिरलेला होता. या कृत्यामागे पाकिस्तानी सैन्यच असून, योग्य वेळी सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा दले योग्य
ती कृती करतील, असे अधिकाºयाने सांगितले.