संशयास्पद बॅग सापडल्याने पठाणकोटमध्ये "हाय अलर्ट"
By admin | Published: May 29, 2017 10:05 PM2017-05-29T22:05:09+5:302017-05-29T22:06:36+5:30
पंजाब सीमेजवळील पठाणकोट जिल्ह्यात असलेल्या मामून मिलिट्री कॅन्टोन्मेंटजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. 29 - पंजाब सीमेजवळील पठाणकोट जिल्ह्यात असलेल्या मामून मिलिट्री कॅन्टोन्मेंटजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन उघडून पाहिली असता , त्यामध्ये लष्कराचे तीन गणवेश सापडले आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पठाणकोटसह संपूर्ण परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पोलीस आणि लष्काराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
गेल्या वर्षी जानेवारीला पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यादरम्यान 36 तास चकमक आणि तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन सुरु होते. तसेच, या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला होता. मात्र, या चकमकीत तीन जवानही सुद्धा शहीद झाले होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा होता.
दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच, तळावर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली होती. याचबरोबर. दहशतवादी पठाणकोटला पोहोचले असल्याची माहिती मिळाली असून या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.
Punjab: High alert in Pathankot, after a suspicious bag containing a uniform was found near Mamun military station last night. pic.twitter.com/wnji6nTMjr
— ANI (@ANI_news) May 29, 2017
Punjab:High alert in Pathankot, search Op being conducted by police SWAT team & Army after a suspicious bag containing 3 uniforms was found pic.twitter.com/WbeKEq6N6p
— ANI (@ANI_news) May 29, 2017