झाकीर मुसा दिसल्याने पंजाबमध्ये हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:36 AM2018-12-07T06:36:53+5:302018-12-07T06:37:10+5:30
काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये दिसल्याची माहिती समोर आल्यामुळे भटिंडा व फिरोजपूर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भटिंडा : काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये दिसल्याची माहिती समोर आल्यामुळे भटिंडा व फिरोजपूर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसा हा शिखाच्या वेशात असू शकतो, असे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. तो अल कायदाशी संबंधित अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
लष्कर जवान, पोलीस व अर्धसैनिक दलाच्या जवानांना भटिंडा रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या आणि त्या परिसरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीच त्याचा शोध सुरु झाला. फिरोजपूर शहर व जिल्ह्णातही पोलीस तैनात सर्वांची कसून तपासणी केली जात आहे.
याआधी नोव्हेंबरमध्येही गुरदासपूर व अमृतसरच्या सीमावर्ती भागांत मुसा लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोस्टर्स लावण्यात आली होती.