उच्च न्यायालयाने दिली प्रधान सचिवांना नोटीस मनपा : शपथपत्राद्वारे खुलासा मागितला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2015 12:03 AM2015-11-25T00:03:12+5:302015-11-25T00:03:12+5:30
जळगाव : मनपाने सेंट्रल फुले मार्केटमधील ९ गाळ्यांची मुदत संपल्याने ८१ ब नुसार सील केले होते. यानंतर प्रधान सचिव यांनी आयुक्तांना पत्र पाठवून सील काढण्याचे आदेश दिले होते. याविरोधात उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी झालेल्या कामकाजात उच्च न्यायालयाने प्रधान सचिवांना नियमबाहय पत्र पाठविल्याबद्दल नोटीस पाठविली आहे.
ज गाव : मनपाने सेंट्रल फुले मार्केटमधील ९ गाळ्यांची मुदत संपल्याने ८१ ब नुसार सील केले होते. यानंतर प्रधान सचिव यांनी आयुक्तांना पत्र पाठवून सील काढण्याचे आदेश दिले होते. याविरोधात उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी झालेल्या कामकाजात उच्च न्यायालयाने प्रधान सचिवांना नियमबाहय पत्र पाठविल्याबद्दल नोटीस पाठविली आहे. शासकीय जमिनीवर सेंट्रल फुले मार्केट आहे. यातील गाळ्यांची मुदत संपल्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांच्या अधिकारात या संकुलातील नऊ गाळे सील करण्याचे सूचित केले होते. मनपाने कायदेशीर कारवाई करूनही प्रधान सचिवांनी गाळ्यांचे सिल पूर्ववत उघडण्यास भाग पाडले होते. याविरोधात उपमहापौरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने नियमबा काम केल्याबद्दल प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात मुख्य सचिवांमार्फत शपथपत्राद्वारे न्यायालयात खुलासा सादर करण्याचे न्यायालयाने प्रधान सचिवांना म्हटल्याची माहिती महासभा संपल्यानंतर नितीन ला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.