केरळमध्ये मंदिर परिसरातल्या रात्रीच्या आतषबाजीला उच्च न्यायालयाकडून मनाई
By admin | Published: April 12, 2016 06:21 PM2016-04-12T18:21:01+5:302016-04-12T18:32:47+5:30
केरळ उच्च न्यायालयानं संध्याकाळपासून पहाटेपर्यंत सर्व मंदिर आणि पूजेच्या ठिकाणी जास्त तीव्रतेच्या फटाक्यांवर बंदी आणली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. १२- केरळ उच्च न्यायालयानं संध्याकाळपासून पहाटेपर्यंत सर्व मंदिर आणि पूजेच्या ठिकाणी जास्त तीव्रतेच्या फटाक्यांवर बंदी आणली आहे. केरळ हायकोर्टानं कोल्लम मंदिरातल्या दुर्घटनेबाबत सीबीआय चौकशीच्या मागणीवर राज्य सरकारचं मत मागवलं आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आता संध्याकाळपासून पहाटेपर्यंत जास्त तीव्रतेच्या फटाक्यांची आतषबाजी करता येणार नाही. न्यायालयानं रात्रीच्या वेळेस कमी तीव्रतेचे रंगीबेरंगी फटाके फोडण्याला मान्यता दिली आहे. केरळ हायकोर्टानं यावेळी पोलिसांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
यावेळी केरळ उच्च न्यायालयानं केरळ राज्य सरकारच्या मताचाही विचार केला आहे. सरकारला पुत्तिंगल दुर्घटनेत राष्ट्रविरोधी शक्तींचा हात असल्याचं वाटत आहे का, अशी विचारणाही न्यायालयानं सरकारला केली आहे.