हायकोर्टात तिघांची जन्मठेप रद्द
By Admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:11+5:302014-12-20T22:27:11+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप रद्द केली आहे.
न गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप रद्द केली आहे.विवेक ऊर्फ विक्की करणसिंग बुंदेले (२८), कमलसिंग बैजुसिंग बुंदेले (४३) व मनीष किशोरसिंग बुंदेले (३३) अशी आरोपींची नावे असून ते दवलामेटी येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव सुदेश जयस्वाल होते. सदर पोलिसांनी एकूण सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने १५ मे २०१२ रोजी वरील तीन आरोपींना जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. प्रत्यक्षदर्शींच्या बयानातील तफावतीसह विविध बाबी लक्षात घेता उच्च न्यायालयाने आरोपींचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.आरोपी व सुदेश जयस्वालच्या कुटुंबीयांमध्ये जुना वाद होता. यामुळे ९ एप्रिल २०११ रोजी आरोपींनी सुदेशची चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप होता. सुदेशची पत्नी शांतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, ॲड. राजेंद्र डागा व ॲड. लक्ष्मीकांत खेरगडे यांनी बाजू मांडली.