गोठवलेली बँक खाती वापरू देण्याचा तिस्ता सेटलवाडांचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला
By admin | Published: October 7, 2015 04:35 PM2015-10-07T16:35:31+5:302015-10-07T16:35:31+5:30
बँकांची गोठवलेली खाती वापरू देण्यासाटी केलेला तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांचा अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ७ - बँकांची गोठवलेली खाती वापरू देण्यासाटी केलेला तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांचा अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळला आहे. गुजरात दंगलीमध्ये जाळल्या गेलेल्या गुलबर्गा सोसायटीचे म्युझियम करण्यासाठी गोळा केलेला निधी सेटलवाड व आनंद यांनी व्यक्तिगत खर्चासाठी उधळल्याचा आरोप असून यासंदर्भात त्यांची व सबरंग आणि सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस या संस्थांची खाती क्राइम ब्रँचने गोठवली होती. नोटीस न देता ही खाती गोठवण्यात आल्याचा बचाव सेटलवाड यांच्या वकिलाने केला आणि ही बँक खाती खुली करावी आणि त्यांना वापरू द्यावी अशी मागणी केली.
या दोघांनी जवळपास १.५१ कोटी रुपये व्यक्तिगत खर्चासाठी वापरल्याचा क्राइम ब्रँचचा दावा आहे.
हायकोर्टाच्या आदेशामुळे सेटलवाड यांना ही बँक खाती अजूनही वापरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.