दिल्लीतील ऑक्सिजनच्या काळ्याबाजाराबद्दल उच्च न्यायालयाची नाराजी; पुरवठादारांसह प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:46 AM2021-04-28T05:46:58+5:302021-04-28T05:50:02+5:30
पुरवठादारांसह प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीतील ऑक्सिजनच्या काळ्याबाजाराबद्दल उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने काळाबाजार करणाऱ्यांना ताब्यात घेण्यास सांगितले आहे. दिल्ली सरकारला कारवाई करण्याचे न्यायालयाने निर्देश दिलेत.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लोकांना लाखो रुपये देऊन काळ्या दराने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यास भाग पाडले जाते, ज्याची किंमत काहीशे रुपये आहे. न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठादारांना सांगितले की, आमचा आत्मविश्वास डळमळत आहे, आपण आपले कार्य योग्य प्रकारे करावे. तसेच दिल्ली सरकारला द्रव आणि वायू स्वरूपातील ऑक्सिजन साठ्याच्या स्थितीचा आढावा घेऊन बुधवारी सकाळी १० वाजता ऑक्सिजन पुरवठादारांसह प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले.
उच्च न्यायालयाने बजावली अवमानना नोटीस! आज सुनावणीदरम्यान हजर नसलेल्या ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांना दिल्ली उच्च न्यायालयाने अवमानना नोटीस बजावली. पुरवठादारांनी दिल्ली सरकारने दिलेल्या आदेशाची दखल घेतली नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली सरकारची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राहुल मेहरा यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि व्यंकटेश्वर रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा निश्चित करू.