'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर! आठवड्याभरात 50 जणांचा मृत्यू; एका बेडवर 3 रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:42 PM2021-08-29T14:42:37+5:302021-08-29T14:57:17+5:30

High fever viral : रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

high fever viral spreading in west uttar pradesh many dead in agra firozabad mathura mainpur | 'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर! आठवड्याभरात 50 जणांचा मृत्यू; एका बेडवर 3 रुग्णांवर उपचार

'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर! आठवड्याभरात 50 जणांचा मृत्यू; एका बेडवर 3 रुग्णांवर उपचार

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,083 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता एका रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात 26 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये रहस्यमयी आजार पसला आहे. यामध्ये लोकांना खूप ताप येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मॅनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये 50 लोकांचा ताप, डिहायड्रेशन आणि प्लेट्सलेट अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 26 लहान मुलांचा समावेश आहे. या रहस्यमयी आजारातून बरं होण्यासाठी लोकांना 12 दिवसांहून अधिक काळ लागत आहे. सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रहस्यमयी आजार चिंतेचा विषय आहे. फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. हंसराज सिंह यांनी हा रहस्यमयी आजार असलेल्या 100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. आग्रा जिल्हा रुग्णालयातील डॉ. एके अग्रवाल यांनी दररोज 200 रुग्ण आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन आठवड्यापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. 

फिरोजाबादमध्ये सर्वात जास्त म्हणजे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती फिरोजाबाद सीएमओ डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी दिली आहे. यामागचं नेमकं कारण शोधण्यात येत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत गंभीर असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग्रातील तिवाहा गावातील प्रत्येक घरामध्ये रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 20 जणांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: high fever viral spreading in west uttar pradesh many dead in agra firozabad mathura mainpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.