इशरत जहाँ गहाळ फाईल प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
By admin | Published: March 14, 2016 04:26 PM2016-03-14T16:26:31+5:302016-03-14T16:43:34+5:30
इशरत जहाँ चकमक प्रकरणातील महत्वाच्या फाईल गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १४ - इशरत जहाँ चकमक प्रकरणातील महत्वाच्या फाईल गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेतीखाली ही समिती तपास करणार आहे. गेल्याच आठवड्यात राजनाथ सिंग यांनी लोकसभेत बोलताना इशरत जहाँ प्रकरणातील महत्वाची कागदपत्र गहाळ झाल्याची तसंच याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.
गुजरात उच्च न्यायालयात 29 सप्टेंबर 2009 मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून महत्वाची कागदपत्र गहाळ झाली असल्याची माहितीही राजनाथ सिंग यांनी दिली होती. त्यावेळचे गृहसचिव जी के पिल्लई यांनी ऍटर्नी जनरल यांना लिहिलेली 2 पत्रं गहाळ आहेत. तसंच दुस-या प्रतिज्ञातपत्राचा ड्राफ्ट ज्यामध्ये पी चिदंबरम यांनी फेरफार केल्याचा आरोप आहे तेही गहाळ असल्याचं सांगितलं होतं. नरेंद्र मोदींना गोवण्यासाठी युपीए सरकारने हे सर्व केल्याचा आरोपदेखील राजनाथ सिंग यांनी केला होता.