थेट मोदींनाच केला फोन, केदारनाथच्या मुख्य पुजाऱ्यास रस्त्याने परत जाण्याची अनुमती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 06:02 AM2020-04-17T06:02:17+5:302020-04-17T06:03:09+5:30
थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का
डेहराडून : ‘लॉकडाऊन’मुळे नांदेड जिल्ह्यात अटकून पडलेले चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर लिंग व मंदिर प्रशासनाच्या आणखी चार कर्मचाऱ्यांना रस्त्याने केदारनाथला परत येण्याची परवानगी मिळाली आहे. परत जाण्याची काही तरी विशेष व्यवस्था करावी अशी विनंती करणारे पत्र लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्याला रस्ता मार्गाने परत जाण्याची परवानगी दिली आहे व त्यामुळे आपण २९ एप्रिलपूर्वी पुन्हा केदारनाथला पोहोचू शकू, असे लिंग यांनी टेलिफोनवरून सांगितले.
थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का, यावरही उत्तराखंड सरकारने विचार केला. ते शक्य न झाल्यावर मंदिर पुन्हा उघडण्याचा समारंभ आॅनलाईन करावा, असेही राज्य सरकारने सुचविले. परंतु त्यास सर्व पुजाºयांनी विरोध केल्यावर अखेर ही परवानगी देण्यात आल्याचे समजते.
आदि शंकराचार्यांच्या वेळेपासून रुढ झालेल्या परंपरेनुसार देवाच्या मंदिरातील पुनरागमनाच्या मिरवणुकीचे यजमानपद मुख्य पुजाºयांकडे असते व मूर्तीला मुकुटही त्यांनीच विधीपूर्वक चढवायचा असतो. भीमाशंकर लिंग यांनी मोदींना पत्र लिहून ही अडचण विषद करून मंदिर पुन्हा उघण्यापूर्वी आपण केदारनाथला पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे लिंग यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. रस्तामार्गे जाण्याची परवानगी दिल्यास आपली जाण्याची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.