नव्या प्रस्तावित रेल्वेसाठी जास्त दर
By admin | Published: April 15, 2016 02:55 AM2016-04-15T02:55:36+5:302016-04-15T02:55:36+5:30
यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केलेली नसली तरी प्रवाशांना नव्या प्रस्तावित रेल्वेंमधून प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचे कारण नव्याने समाविष्ट
नवी दिल्ली : यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केलेली नसली तरी प्रवाशांना नव्या प्रस्तावित रेल्वेंमधून प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचे कारण नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सुविधा हे आहे.
काही विशेष सुधारित सुविधांचा पुरविण्यासाठी रेल्वेने कंबर कसली आहे. त्यामुळे नियमित प्रवासभाडे लागू होणार नसल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावर्षी हमसफर, तेजस, उत्कर्ष डबल डेकर (वातानुकूलित यात्री- उदय) या नव्या गाड्या धावणार असून नियमित दरांच्या तुुलनेत १५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात या रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती.
कोणत्या मार्गावर या गाड्या सुरू करण्यासह स्थळांची निवड केली जात आहे. काही मार्गांवरील वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेने याआधीच नैमत्तिक ‘सुविधा रेल्वे’ सुरू केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
तेजस ताशी १३० कि.मी.
‘हमसफर’मधील सर्व डबे एसी थ्री टायर असतील. तेजस या नव्या रेल्वेचा वेग ताशी १३० कि.मी. राहील. उदय या नव्या डबल डेकर रेल्वेची क्षमता ४० टक्क्यांनी जास्त असेल.