लाचलुचपतचे एका दिवसात उच्चांकी सापळे
By Admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:48+5:302015-09-03T23:52:48+5:30
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उच्चांकी कारवाई करीत राज्यात एकूण १३ ठिकाणी सापळा कारवाई करीत लाचखोरांना गजाआड केले. लाचलुचपतच्या पुणे विभागात चार, औरंगाबाद विभागात चार, मुंबई आणि नागपुरमध्ये प्रत्येकी दोन आणि नाशिक विभागात एक अशा एकूण १३ कारवाई करण्यात आल्या आहेत.
प णे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उच्चांकी कारवाई करीत राज्यात एकूण १३ ठिकाणी सापळा कारवाई करीत लाचखोरांना गजाआड केले. लाचलुचपतच्या पुणे विभागात चार, औरंगाबाद विभागात चार, मुंबई आणि नागपुरमध्ये प्रत्येकी दोन आणि नाशिक विभागात एक अशा एकूण १३ कारवाई करण्यात आल्या आहेत. पुण्यातील एसआरपीएचच्या वैद्यकीय अधिका-याला ३५० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यातील तलाठी, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी लाच घेताना सापडले. यासोबतच मुंबईतील आरटीओ एजंटसह २ खासगी व्यक्ती, नागपुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर, गडचिरोलीमध्ये महिला पोलीस कर्मचारी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कृषी सहायक, जालना जिल्ह्यात घनसावंगी तहसील कार्यालयामधील वरिष्ठ लिपीक आणि औरंगाबाद मधील म्हाडा कार्यालयाचा सहायक, उस्मानाबाद जिल्ह्याचा विविध कार्यकारी सोसायटीचा सचिव, नाशिक येथील पोलीस हवालदार अशा विविध भागातील लाखखोरांना एसीबीने एकाच दिवशी पकडल्यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.