सूक्ष्म गुंतवणुकीपेक्षा एफडीवर जास्त व्याज; रेपो रेट वाढल्याचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 12:37 PM2022-11-05T12:37:18+5:302022-11-05T12:40:01+5:30
ही वाढ साधारणत: २% आहे. असे असले तरी दुसरीकडे बँकांनी मुदत ठेव याेजनांच्याही व्याजदरात वाढ केली आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षात चार वेळा रेपाे रेटमध्ये वाढ केली आहे. परिणामी व्याजदरांमध्येही वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना मात्र याचा फटका बसला असून, विविध कर्जांचा मासिक हप्ता वाढला आहे.
ही वाढ साधारणत: २% आहे. असे असले तरी दुसरीकडे बँकांनी मुदत ठेव याेजनांच्याही व्याजदरात वाढ केली आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. सरकारच्या अल्प बचत याेजनांच्या तुलनेत यामध्ये परतावा सध्या चांगला मिळत आहे.
गंगाजळीत सुधारणा होणार-
बँकांच्या माहितीनुसार, एफडीवर अधिक व्याज दिल्यामुळे गंगाजळीत सुधारणा होईल. बँकांच्या उसनवाऱ्यांत अशीच वाढ होत राहिली तर तिसऱ्या तिमाहीत सामान्य एफडीवरही व्याजदर वाढविले जातील.
आपल्या साेयीनुसार करा निवड-
काही बँका विशेष ठेव योजनांवर ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. अल्पबचत योजनांपैकी सुकन्या समृद्धी योजनेवर सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळते. मात्र, या योजनांचा लॉकइन अवधीही जास्त असतो. बँकांतील ठेवींचा कालावधी लवचीक असतो. आपल्या सोयीनुसार तो निवडता येतो.