महाराष्ट्रातील पुरूष दारू पिण्यात देशात ‘या’ क्रमांकावर; गोव्यालाही मागे टाकत तेलंगणा आघाडीवर

By प्रविण मरगळे | Published: December 16, 2020 09:07 AM2020-12-16T09:07:10+5:302020-12-16T09:09:50+5:30

महिलांच्या मद्यपानाप्रमाणे, ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला १६.२% आकडेवारीसह अव्वल आहे

Higher Percentage Men Drink In Dry Bihar Than Goa And Maharashtra Says Govt Survey | महाराष्ट्रातील पुरूष दारू पिण्यात देशात ‘या’ क्रमांकावर; गोव्यालाही मागे टाकत तेलंगणा आघाडीवर

महाराष्ट्रातील पुरूष दारू पिण्यात देशात ‘या’ क्रमांकावर; गोव्यालाही मागे टाकत तेलंगणा आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देदारू पिण्याच्या बाबतीत तेलंगणाचे पुरुष पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महिलाही मागे नाहीतया सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगणा वगळता ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.ईशान्येकडील मिझोरम राज्यात ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर ६५ टक्के स्त्रियांनाही तंबाखूचं व्यसन

नवी दिल्ली – बिहारमधील तळीरामांची संख्या पाहून तुम्हाला धक्का बसेल, बिहारमध्ये भलेही दारूबंदी असली राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० च्या आकडेवारी समोर आली आहे. मद्यपान करण्याच्या बाबतीत तेलंगणा गोव्यापेक्षा पुढे आहे तर तंबाखूच्या सेवनात इशान्येकडील राज्यं टॉपवर आहेत.

काश्मीर, गुजरातमधील पुरुष सर्वात कमी मद्यपान करतात

या सर्वेक्षणानुसार दारू पिण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील पुरुष देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकमधील पुरुष सर्वाधिक मद्यपान करतात. दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. तथापि, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत, मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येत काही बदल झालेत की नाही याबद्दल माहिती मिळाली नाही. २०१५-१६ च्या सर्वेक्षणात १५-४९ वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण केले गेले, तर नवीन सर्वेक्षणात १५ वर्षांवरील सर्व लोकांचा समावेश आहे.

मद्यपान करण्याच्या बाबतीत सिक्कीमच्या महिला अव्वल

महिलांच्या मद्यपानाप्रमाणे, ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला १६.२% आकडेवारीसह अव्वल आहे, तर आसाममधील ७.३% महिला मद्यपान करतात आणि हे राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दारू पिण्याच्या बाबतीत तेलंगणाचे पुरुष पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महिलाही मागे नाहीत, त्यादेखील दारू पिण्यात तिसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगणा वगळता ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.

गावात महिला मोठ्या प्रमाणात दारू पितात!

शहरी महिलांपेक्षा खेड्यांमधील स्त्रिया तुलनेने जास्त दारू पितात. देशातील बर्‍याच भागात हीच परिस्थिती आहे. गावातील स्त्रिया मद्यपान करते सांगण्यात अजिबात संकोच करत नाहीत हेदेखील यामागचं कारण असू शकतं. तर शहरी महिलांना याबद्दल सांगताना थोडासा संकोच करतात. शहरी आणि ग्रामीण पुरुष मद्यपान करतात परंतु महिलांइतके त्यांच्यात अंतर नाही.

दारूपेक्षा तंबाखूचे अधिक सेवन!

देशातील सर्व राज्यांमध्ये तंबाखूचा वापर सर्वाधिक आहे. ते तंबाखूजन्य पदार्थांवर खाल्ल्यामुळे कर्करोगाची जाहिरात करूनही लोकांमध्ये प्रचंड व्यसन आहे. पूर्वीच्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, लोक दारूपेक्षा जास्त तंबाखू खातात.

मिझोरममध्ये बरेच लोक तंबाखूचं सेवन करतात

ईशान्येकडील मिझोरम राज्यात ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर ६५ टक्के स्त्रियांनाही तंबाखूचं व्यसन आहे. तंबाखूच्या वापराच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. ईशान्य राज्यात महिला आणि पुरुषांमध्ये तंबाखूचा सर्वाधिक वापर आहे. दक्षिणेकडील केरळ राज्यात तंबाखूचा सर्वात कमी वापर होतो, जेथे केवळ १७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. १८ टक्के पुरुष गोव्यात तंबाखू खातात. महिलांच्या तंबाखू सेवनाच्या बाबतीत, हिमाचल प्रदेशात १.७ % तंबाखूचं सेवन केलं जातं.

Web Title: Higher Percentage Men Drink In Dry Bihar Than Goa And Maharashtra Says Govt Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.