प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे अधिक प्रमाण, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 10:16 AM2023-05-18T10:16:41+5:302023-05-18T10:17:21+5:30
एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी निगडित याचिकेच्या सुनावणीप्रसंगी न्या. भूषण गवई व न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले.
नवी दिल्ली : प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.
एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी निगडित याचिकेच्या सुनावणीप्रसंगी न्या. भूषण गवई व न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. या दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, प्रेमविवाहातून हे सारे प्रकरण उद्भवले आहे. त्यावर न्या. भूषण गवई म्हणाले की, प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. वाद सुरू असलेल्या दाम्पत्याला ध्यान किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; पण त्याला पतीने विरोध केला होता.
विवाह टिकविण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला न्यायालयाने अर्जदार दाम्पत्याला दिला होता. मात्र, त्यांना घटस्फोटच हवा होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता.