भारतात जन्मले सर्वाधिक वजनाचे बाळ!

By admin | Published: May 27, 2016 04:34 AM2016-05-27T04:34:05+5:302016-05-27T04:34:05+5:30

नंदिनी नावाच्या १९ वर्षे वयाच्या मातेने येथील सरकारी इस्पितळात गेल्या सोमवारी ६.८ किलो (सुमारे १५ पौंड) वजनाच्या मुलीला जन्म दिला. सर्वसाधारणपणे नवजात बाळांचे

The highest child born in India! | भारतात जन्मले सर्वाधिक वजनाचे बाळ!

भारतात जन्मले सर्वाधिक वजनाचे बाळ!

Next

हसन (कर्नाटक) : नंदिनी नावाच्या १९ वर्षे वयाच्या मातेने येथील सरकारी इस्पितळात गेल्या सोमवारी ६.८ किलो (सुमारे १५ पौंड) वजनाच्या मुलीला जन्म दिला. सर्वसाधारणपणे नवजात बाळांचे वजन ३.४ किलो असते. याहून दुप्पट वजनाची आणि आकाराने सहा महिन्यांच्या बाळाएवढी असणारी ही मुलगी जगातील सर्वाधिक वजनाचे बाळ असल्याचे मानले जात आहे.
या चमत्कारी मुलीला जन्म देणारी नंदिनी स्वत: ९४ किलो वजनाची व ५ फूट
९ इंच उंचीची आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेने तिला जन्माला घालण्यात आले. ही नवजात मुलगी पूर्णपणे सुदृढ असून, तिच्यात कोणताही जन्मजात दोष आढळलेला नाही. तरीही आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर बाळ-बाळंतिणीस घरी सोडले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
नंदिनीची प्रसूती शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूर्णिमा मनू यांनी सांगितले की, नंदिनी प्रसूतीच्या काळात चेक-अपसाठी नियमितपणे यायची तेव्हा तिला एवढे मोठे बाळ होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे जन्माला आलेल्या मुलीचा आकार व वजन पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.
डॉ. मनू म्हणाल्या की, जन्मलेल्या मुलीचे साखरेचे प्रमाण व थायरॉईड ग्रंथीचे कार्य उत्तम आहे. आकार आणि वजन सर्वसाधारण बाळांच्या तुलनेत दुप्पट असले तरी तिला श्वसनाचा कोणताही त्रास नाही. इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राजू म्हणाले की, माझ्या २५ वर्षांच्या डॉक्टरी पेशात आकाराने व वजनाने एवढे मोठे बाळ जन्माला आलेले मी पाहिलेले नाही.

जागतिक विक्रमाची अपेक्षा
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फिर्दोस खातून या महिलेने जन्माला घातलेला ६.७ किलो (१४.७७ पौंड) वजनाचा मुलगा हे आजवरचे भारतात जन्मलेले सर्वाधिक वजनाचे बाळ होते. नंदिनीच्या मुलीने या मुलाला आता मागे टाकले आहे.
गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार
कॅनडातील अ‍ॅना बेट्स या महिलेने सन १८७९मध्ये जन्माला घातलेले २३ पौंड १२ औंस वजनाचे बाळ हे आजवरचे सर्वाधिक वजनदार बाळ आहे. मात्र या बाळाचा जन्मानंतर अवघ्या ११ तासांत मृत्यू झाला होता.
तीनच आठवड्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात झैद कॅडिक हा ६ किलो वजनाचा मुलगा जन्माला आला होता. अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स शहरात सन २०१४मध्ये जन्मलेल्या कॅरिसा रुसाक हिचे वजन ६.५ किलो होते.

Web Title: The highest child born in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.