ग्रामीण विकास व कृषीवर सर्वाधिक खर्च

By admin | Published: March 11, 2016 12:27 AM2016-03-11T00:27:34+5:302016-03-11T00:27:34+5:30

ग्रामीण विकास व कृषीवर सर्वाधिक खर्च

The highest expenditure on rural development and agriculture | ग्रामीण विकास व कृषीवर सर्वाधिक खर्च

ग्रामीण विकास व कृषीवर सर्वाधिक खर्च

Next
रामीण विकास व कृषीवर सर्वाधिक खर्च
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवेंतर्गत येणार्‍या पिक संवर्धन, फलोत्पादन, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय विकास, तसेच सहकार विभागाकडून ७० टक्क्यांपर्यत निधी खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणार्‍या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण रोजगार योजनेचा ५ कोटी ६ लाखांचा संपूर्ण निधी खर्च झाला आहे. यासह विद्युत विकास, ग्रामीण व लघु उद्योग, नगरविकासासाठी देण्यात आलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे.
पाटबंधारे व परिवहनची पिछाडी
पाटबंधारे व पूरनियंत्रण या घटकांतर्गत लघु पाटबंधारे योजना राबविण्यात येत असते. त्यासाठी ४१ कोटी ६५ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत केवळ १८ कोटी ५८ लाखांची कामे झाली आहेत. रस्तेविकासासाठी ४१ कोटी ९६ लाखांची रक्कम वितरित करण्यात आली. मात्र त्यापैकी केवळ १८ कोटी ९१ लाखांच्या रस्त्याचे कामे झाली आहेत. आरोग्य सेवेसाठी वितरित करण्यात आलेल्या सात कोटी ४ लाखांपैकी केवळ दोन कोटी २६ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

Web Title: The highest expenditure on rural development and agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.