प्रमुख मार्गांची झाली चाळणी

By admin | Published: June 19, 2016 12:14 AM2016-06-19T00:14:49+5:302016-06-19T00:14:49+5:30

दूध फेडरेशन परिसर

Highlights: | प्रमुख मार्गांची झाली चाळणी

प्रमुख मार्गांची झाली चाळणी

Next
ध फेडरेशन परिसर
पावसामुळे दूध फेडरेशनजवळील सुमारे १५० मीटर रस्ताही खराब झाला आहे. राजा ट्रॅक्टर्ससमोर तर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये माती व वेेस्ट मटेरियल टाकलेले असल्याने त्याचे चिखलात रुपांतर झाल्याचे दिसून आले. या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मोठी वर्दळ असते.

पिंप्राळा रेल्वेगेटवळ पाणी तुंबले
पिंप्राळा रेल्वे गेटनजीक रस्त्यावर पाणी तुंबले. दोन्ही बाजूला पाणी तुंबलेले होते. पाणी तुंबल्याने वाहनधारकांना थोडे वळण घेऊन जावे लागत होते. फाटक बंद असताना या पाण्यात आपली वाहने उभे करण्याशिवाय वाहनधारकांना पर्याय नव्हता.
केसी पार्कनजीकही सर्कस
केसी पार्कनजीक पालिकेच्या हद्दीमधील सुमारे २०० मीटर रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मुरूम, इमारतींचे वेस्ट मटेरियल टाकलेले असल्याने हा रस्ता आता ओबडधोबड झाल्याचे दिसून आले. जकातनाकाजवळ तर अधिकच बिकट स्थिती होती. एका खड्ड्यात विटा टाकलेल्या होत्या. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना प्रचंड सर्कस करावी लागत होती. या रस्त्यावरून केसी पार्क, त्रिभुवन कॉलनी भागातील नागरिकांसह कानळदा, आव्हाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ ये-जा करतात.

शिवाजीनगर पुलाखालीही साचले पाणी
शिवाजीनगर पूल पार केल्यानंतर भिकमचंद जैन शाळेसमोर मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पाण्यात ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा उभ्या होत्या. या रिक्षांपासून पुढे काही अंतरावर रेल्वे स्टेशनच्या भिंतीनजीकही पाणीच पाणी साचले होते.

नवीपेठेतही दाणादाण
नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात सरस्वती डेअरीनजीकच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारीचे पाणी काही प्रमाणात रस्त्यावर आले होते. या भागातील गटारी तुंबल्याने दुर्गंधी पसरल्याचे चित्र होते. अधिकचा पाऊस झाला तर या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व पावसाचे पाणी साचेल, अशी स्थिती आहे.

गोलाणी मार्केटजवळही तुंबले पाणी
गोलाणी मार्केटजवळ शिरपूर बँकेनजीक मुख्य रस्त्यावर पाणी तुंबले होते. रस्त्यावर सकाळी मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला होता. त्याची दुर्गंधी परिसरात पसरली होती. दरवर्षी या भागात पाणी साचते. गटारीतून प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर येतात, परंतु उपाययोजना केली जात नाही. ही समस्या कायम असल्याने या भागातील दुकानदार व इतर व्यावसायिक त्रस्त आहेत.

Web Title: Highlights:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.