भव्यदिव्यतेसह स्पर्धेला हायटेक स्वरुप प्रत्येक लढतीचे चित्रिकरण, मल्लांसह पंच, माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:37+5:302014-12-20T22:27:37+5:30

अहमदनगर : मर्दानी खेळातील शान आणि राज्यातली सर्वात मोठी समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरच्या मातीत भव्यदिव्यतेसह हायटेक स्वरुपाची ठरणार आहे़ तीन आखाडे, प्रत्येक लढतीचे व्हिडियो चित्रण, मल्लांसह पंच, पदाधिकारी आणि माध्यमप्रतिनिधींना ओळखपत्र हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरणार आहे़

Highlights of the competition with the spectacular horoscope, photographs of each fight | भव्यदिव्यतेसह स्पर्धेला हायटेक स्वरुप प्रत्येक लढतीचे चित्रिकरण, मल्लांसह पंच, माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र

भव्यदिव्यतेसह स्पर्धेला हायटेक स्वरुप प्रत्येक लढतीचे चित्रिकरण, मल्लांसह पंच, माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र

Next
मदनगर : मर्दानी खेळातील शान आणि राज्यातली सर्वात मोठी समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरच्या मातीत भव्यदिव्यतेसह हायटेक स्वरुपाची ठरणार आहे़ तीन आखाडे, प्रत्येक लढतीचे व्हिडियो चित्रण, मल्लांसह पंच, पदाधिकारी आणि माध्यमप्रतिनिधींना ओळखपत्र हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरणार आहे़
आयोजकाच्यावतीने तयारी अंतिम टप्प्यात असून, आखाड्याचे काम पूर्ण झाले असून, व्यासपीठाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ दि़ २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होणार्‍या स्पर्धेसाठी राज्यभरातील मल्लांचा ताफा २४ तारखेलाच नगरमध्ये डेरेदाखल होणार आहे़ सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी जेतेपद पटकावून इतिहास घडविणारा नरसिंग यादवने नगरच्या मातीत खेळण्यासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत़ यादवसह विजय चौधरी, समाधान पाटील, सचिन मोहळे, मारुती जाधव, नंदू आबदार, राजेंद्र सूळ, योगेश पवार, पवन भिंगारे हे केसरीचे दावेदारही कसब आजमाविणार आहेत़ गादी आणि मातीत रंगणारा थरार नगरकरांसाठी पर्वणी ठरणार आहे़ माती विभागात ५७, ६१,६५,७०,७४ तर गादी विभागात ५७, ६१,६५,७०,७४, ८६,९८ किलो वजन गटात लढती रंगणार आहेत़ अंतिम महाराष्ट्र केसरीची ८६ ते १२५ किलो वजन गटात लढत होणार आहे़ प्रत्येक गटातील पहिल्या तीन कुस्तीपटूंना पदके देण्यात येणार आहेत.
अंतिम लढतीकडे लक्ष्य
महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत गादीवर होणार असून, नरसिंग यादवसह विजय चौधरी, समाधान पाटील, सचिन मोहळे, मारुती जाधव, नंदू आबदार, राजेंद्र सूळ, योगेश पवार, पवन भिंगारे हे केसरीचे दावेदारही कसब आजमाविणार आहेत़
दोनदा जेतेपद मिळविणारे मल्ल
गणपतराव खेडकर (सांगली) १९६४ आणि १९६५, चंबा मूतनाळ (कोल्हापूर) हे १९६८ आणि १९६७, दादू चौगुले (कोल्हापूर) १९७० आणि १९७१, लक्ष्मण वडार (कोल्हापूर) १९७२ आणि १९७३ सांगलीचा चंद्रहार पाटील २००७ आणि २००८ मध्ये डबल महाराष्ट्र केसरी झाला होता़ यांपैकी एकाही नामवंत मल्लाला तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी जिंकता आली नाहीत. मागील वर्षी पुणे येथील भोसरी येथे झालेल्या स्पर्धेत नरसिंग यादवने यांचा रेकॉर्ड ब्रेक करत तिसर्‍यांना जेेतेपद मिळविले होते़

Web Title: Highlights of the competition with the spectacular horoscope, photographs of each fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.