Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:38 PM2020-08-15T12:38:02+5:302020-08-15T12:38:55+5:30

Independence Day 2020 : डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्‍याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे.

highspeed internet optical fiber network to 6 lakh villages within 1000 days says modi | Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Next

नवी दिल्ली - देशामध्ये इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्‍याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक गावे ही ऑप्टिकल फायबरने जोडली जाणार आहेत. जेणेकरून तिथे इंटरनेट पोहोचू शकेल. हाय स्पीड इंटरनेट असणार आहे जेणेकरून गावातील लोकांचे जीवन देखील बदलू शकेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

दीड लाख पंचायतींमध्ये ‘ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या एक हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याची घोषणा मोदींनी केली. 2014 आधी अनेक पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत दीड लाख पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या आहेत. सर्व पंचायतींना ऑप्टिकल फायबर पुरविणे हे मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे. आता जवळपास एक लाख पंचायती शिल्लक असून तेथे वेगाने काम सुरू आहे.

इंटरनेटची वाढती गरज लक्षात घेऊन मोदींनी असं म्हटलं आहे. गावातल्या लोकांसाठीही ऑनलाईन सुविधांची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने आपली योजना बदलली आहे. आधी योजना अशी होती की सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडली जातील, पण आता देशातील सहा लाखांहून अधिक गावं ऑप्टिकल फायबरशी जोडली जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या एक हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

Web Title: highspeed internet optical fiber network to 6 lakh villages within 1000 days says modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.