लालूंच्या घरात हायव्होल्टेज ड्रामा; राबडीदेवींवर ऐश्वर्याला मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 09:33 PM2019-12-15T21:33:38+5:302019-12-15T21:33:47+5:30

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे.

Highvoltage Drama in Lalu's House; Rabddevi accused of beating Aishwarya |  लालूंच्या घरात हायव्होल्टेज ड्रामा; राबडीदेवींवर ऐश्वर्याला मारहाणीचा आरोप

 लालूंच्या घरात हायव्होल्टेज ड्रामा; राबडीदेवींवर ऐश्वर्याला मारहाणीचा आरोप

Next

पाटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे. रविवारी पाटणास्थित लालू-राबडी यांच्या घरात तेजप्रताप यादव याची पत्नी ऐश्वर्या राय हिला राबडी देवींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पाटणातल्या राबडी देवींच्या 10, सर्क्युलर रोडवरच्या घरात हा हंगामा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राबडी देवींच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाले आहेत. महिला पोलीस ऐश्वर्या रायला तिकडून घेऊन गेली.

ऐश्वर्या राय यांच्या आरोपांवर आरजेडीचे आमदार शक्ती सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित होतो, राबडी देवींनी ऐश्वर्या रॉयला मारहाण केलेली नाही. ऐश्वर्याचे आरोप निराधार आहे. दुसरीकडे तेजप्रताप यादवांच्या समर्थकांनी ऐश्वर्या रायचे वडील चंद्रिया राय यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. सप्टेंबर महिन्यातही ऐश्वर्या राय यांनी लालू कुटुंबीय मारहाण करत असून, घरातून काढण्यासाठी दबाव निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. ऐश्वर्यानं मीसा भारतींवरही मारहाणीचा आरोप लावला आहे. 

लालूंचा पुत्र तेजप्रतापनं गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेजप्रतापचं आरजेडी नेते चंद्रिका राय आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्याबरोबर 12 मे 2018 रोजी लग्न केलं होतं. तेजप्रताप यांनी पत्नी ऐश्वर्यावर प्रतारणेचा आरोप केला होता. तसेच ऐश्वर्यामुळे आईवडील (लालू यादव-राबडी देवी) बराच त्रास झालेला आहे. ऐश्वर्या आणि तेजप्रताप यांच्या वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये. 
 

Web Title: Highvoltage Drama in Lalu's House; Rabddevi accused of beating Aishwarya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.