टल्ली जोडप्याचा रस्त्यावर अश्लिलतेचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 10:53 AM2018-04-05T10:53:52+5:302018-04-05T10:53:52+5:30

गुरूग्राम पोलिसांनी एका तरूण-तरूणीला सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन केल्याच्या आरोपात अटक केली आहे.

'Highvoltage Drama' of the Tolly Couple on the Road | टल्ली जोडप्याचा रस्त्यावर अश्लिलतेचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

टल्ली जोडप्याचा रस्त्यावर अश्लिलतेचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

Next

गुरूग्राम- गुरूग्राम पोलिसांनी एका तरूण-तरूणीला सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन केल्याच्या आरोपात अटक केली आहे. सेक्टर 15 पार्ट टुममध्ये बुधवारी सकाळी जवळपास पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. गुरूग्राममध्ये राहणाऱ्या एका 52 वर्षीय महिलेला अचानक जोरजोरात दार वाजविल्याचा आवाज आला. तेव्हा सकाळचे पाच वाजले होते, बाहेर अंधारही खूप होता. महिलेन दरवाजा उघडल्यावर तिला पार्किंगमध्ये एक जोडपं अश्लिल वर्तन करताना दिसलं. त्यानंतर महिलेने पोलिसांना फोन करून याबद्दलची माहिती दिल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली. 

पार्किगमध्ये अश्लिल चाळे करत असलेल्या जोडप्यामधील तरूणीला तक्रारकर्ती महिलेने ओळखलं होतं. ती मुलगी महिलेच्या शेजारी राहणारीच होती. महिलेने मुलीला तिच्या नावाने आवाज दिला पण त्या दोघांनीही महिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. महिलेने पुन्हा आवाज दिल्यावर त्या तरूणीने महिला गैरव्यवहार करत असल्याची धमकी दिली. इतकंच नाही, तर ती महिला गाडीवर पोहचल्यावर तरूणी त्यांच्याशी अश्लिल भाषेत बोलायला लागली. याचदरम्यान मुलीबरोबर असलेल्या त्या तरूणाने महिलेती ओढणीसुद्धा खेचली. ते दोघेही पूर्णपणे नशेत होते, अशी माहिती तक्रारदार महिलेने पोलिसांना दिली आहे. 

यानंतर महिलेने आजूबाजूच्या लोकांना उठवून पोलिसांना माहिती दिली. तक्रारीनंतर सिव्हिल लायन्स पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या दोघांना अटक केली. आरोपी मुलाची ओळख हर्ष या नावाने पटली असून तो दिल्लीतील नजफगढच्या धर्मपूर कॉलिनीतील राहणारा आहे. दोघांना अटक करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरुणाची रवानगी तुरूंगात झाली असून तरुणीला जामिन मिळाल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे. 

Web Title: 'Highvoltage Drama' of the Tolly Couple on the Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.