Hijab controversy: हिजाब वाद! विद्यार्थीनीचा आरोप- 'हिजाब घातला म्हणून प्राध्यापकाने वर्गाबाहेर काढले'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:39 AM2022-02-10T10:39:31+5:302022-02-10T10:40:02+5:30

Hijab controversy: कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता उत्तर प्रदेशच्या जौनपूरपर्यंत पोहचला आहे. येथील एका कॉलेजच्या विद्यार्थीनेने प्राध्यापकावर वर्गाबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

Hijab controversy: hijab controversy in Uttar Pradesh, girl Student's allegation: 'Professor kicked her out of class for wearing hijab' | Hijab controversy: हिजाब वाद! विद्यार्थीनीचा आरोप- 'हिजाब घातला म्हणून प्राध्यापकाने वर्गाबाहेर काढले'

Hijab controversy: हिजाब वाद! विद्यार्थीनीचा आरोप- 'हिजाब घातला म्हणून प्राध्यापकाने वर्गाबाहेर काढले'

Next

जौनपूर:कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता उत्तर प्रदेशातील जौनपूरपर्यंत पोहोचला आहे. शहरातील तिलधारी सिंग डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनीने हिजाब घालून कॉलेजमध्ये गेल्यामुळे प्राध्यापिकेने वर्गातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आरोप करणारी विद्यार्थिनी जरीना बीएम अंतिम वर्षात शिकते.

जरीनाने आरोप केला आहे की, बुधवारी दुपारी 2 वाजता ती हिजाब घालून वर्गात बसली होती. तेवढ्यात वर्गात आलेले राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रशांत त्रिवेदी यांनी तिला हटकले. अशा प्रकारचे ड्रेस घालून वर्गात का येते, असा प्रश्न प्राध्यापकाने विचारला. तसेच, असे कपडे घालणे म्हणजे वेडेपणाचे असल्याचे प्राध्यपकाने म्हटले, असाही आरोप विद्यार्थीनीने काल आहे. घडलेला या प्रकारानंतर विद्यार्थीनी रडत घरी गेली. घरी पोहचल्यानंतर तिने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. 

प्राध्यपकाने केले आरोपांचे खंडन
याप्रकरणी गुरुवारी पोलीस ठाणे आणि महाविद्यालयात तक्रार करणार असल्याचे तरुणीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्राध्यापक प्रशांत त्रिवेदी सांगतात की, वर्गात राजकारण या विषयावर चर्चा सुरू होती आणि ही चर्चा हिजाबपर्यंत पोहचली. यादरम्यान तरुणी उठली आणि जोरजोरात ओरडू लागली. मी तिला शांत बसायला सांगितले, पण ती ऐकत नव्हती. राहिला प्रश्न ड्रेसचा, तर तिने कोणता ड्रेस घालायचा किंवा घालायचा नाही, हे सांगणारा मी कुणी नाही. हे कॉलेज व्यवस्थापनाचे काम आहे, असेही ते म्हणाले.

या प्रकरणावर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आलोक सिंह म्हणतात की, आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही. कोणीही अशाप्रकारची तक्रार केलेली नाही. मी संध्याकाळी 6 पर्यंत कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये कॉलेजचाच ड्रेस घातला पाहिजे, बाकी कॉलेजबाहेर कुणाला कोणते कपडे घालायचे, त्याच्याशी मला काही देणं-घेणं नाही.
 

Web Title: Hijab controversy: hijab controversy in Uttar Pradesh, girl Student's allegation: 'Professor kicked her out of class for wearing hijab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.