Hijab Row: "हिजाबवर हात टाकला तर हात कापून टाकू", सपा नेत्या रुबिना खानुम यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 03:57 PM2022-02-12T15:57:37+5:302022-02-12T16:00:22+5:30

Hijab Row : कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात हिजाबवर बंदी घालण्याच्या विरोधात अलीगढमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.

hijab row : Will chop arms of those who out hands on hijab, says SP leader Rubina Khanum | Hijab Row: "हिजाबवर हात टाकला तर हात कापून टाकू", सपा नेत्या रुबिना खानुम यांचं वादग्रस्त विधान

Hijab Row: "हिजाबवर हात टाकला तर हात कापून टाकू", सपा नेत्या रुबिना खानुम यांचं वादग्रस्त विधान

Next

नवी दिल्ली : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Row) प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत उमटू लागले आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) नेत्या आणि महानगर अध्यक्षा रुबिना खानुम (Rubina Khanum) हिजाब प्रकरणी वादग्रस्त विधान केले आहे. हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू, असे रुबिना खानुम म्हणाल्या. दरम्यान, कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात हिजाबवर बंदी घालण्याच्या विरोधात अलीगढमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.

"भारत हा विविधतेचा देश आहे. कपाळी टिळक असो की पगडी, बुरखा असो की हिजाब, हे सर्व आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यावर राजकारण करून वाद निर्माण करणे म्हणजे नीचतेची उंची आहे. महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. बहिणी-मुलींच्या स्वाभिमानाला हात घातला तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून त्यांचे हात कापून टाकू", असे रुबिना खानुम म्हणाल्या. 

दरम्यान, हिजाबचा वाद कर्नाटकातील उडुपीपासून (Udupi) सुरू झाला होता. येथे काही विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश करण्यास विरोध केला आणि त्यांनी भगवा रंगाची गमछा परिधान करून महाविद्यालयात येण्यास सुरुवात केली. नंतर उडुपीच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असेच घडले.

कर्नाटकात 16 तारखेपर्यंत महाविद्यालये बंद
दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सर्व पदवी महाविद्यालये, विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी उच्च शिक्षण विभागाने 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र दरम्यानच्या काळात अकरावी आणि बारावीच्या शाळा बंद करण्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Web Title: hijab row : Will chop arms of those who out hands on hijab, says SP leader Rubina Khanum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.