भारतीय राजकारण्यांनी केलं हिलरी क्लिंटनना अर्थसहाय्य - डोनाल्ड ट्रम्प
By admin | Published: June 25, 2016 03:04 PM2016-06-25T15:04:59+5:302016-06-25T15:04:59+5:30
भारत अमेरिका अणू कराराला पाठिंबा मिळावा यासाठी भारतीय राजकारणी आणि संस्थांनी हिलरी क्लिंटनला आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - भारत अमेरिका अणू कराराला पाठिंबा मिळावा यासाठी भारतीय राजकारणी आणि संस्थांनी हिलरी क्लिंटनला आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी प्रकाशित केलेल्या 35 पानी पुस्तिकेमध्ये हे आरोप करण्यात आले असून ते याआधीही वेगवेगळ्या पातलीवर करण्यात आले होते. याआधीही क्लिंटन यांनी हे आरोप फेटाळले होते.
क्लिंटन यांच्याबद्दल अचूक माहिती गोळा करण्यात आली असून ही माहितीही योग्य असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्ताचा दाखला देत ट्रम्प यांनी आरोप केला की 2008 मध्ये अमर सिंग या भारतीय राजकारण्याने एक ते पाच दशलक्ष डॉलर्सची मदत क्लिंटन फाउंडेशनला केली होती. भारताला नागरी वापरासाठी अणूतंत्रज्ञान मिळावे यासाठी सिंग यांनी अमेरिकेमध्ये काही गटांची भेट घेतली होती आणि त्यावेळी सिनेटर क्लिंटननी त्यांना भारताशी अणूकरार करण्याचे आश्वासन दिले होते.
कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री किंवा CII ने देखील क्लिंटन फाउंडेशनला पाच ते दहा लाख डॉलर्सचे अर्थसहाय्य केल्याचा आरोप ट्रम्प यांनी नव्याने केला आहे. भारतीय वंशाचा अमेरिकी व्यक्ती राज फर्नांडो यास क्लिंटनच्या अधिकाऱ्यांनी सरकारमध्ये महत्त्वाचे पद दिल्याचे आणि फर्नांडोंनीही क्लिंटन फाउंडेशनला 1 ते 5 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
जगभरात इस्लामिक स्टेट पसरण्यास क्लिंटन यांचे विदेश धोरण कारण असून त्यामुळे अमेरिकेने हजारो माणसं आणि अब्जावधी डॉलर्स गमावल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.