कोरोनाच्या संकटातही पीपीई किट खरेदीत घोटाळा; हिमाचल भाजपा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:57 PM2020-05-27T18:57:21+5:302020-05-27T18:58:36+5:30
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या संकटातही घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीपीई किट खरेदी घोटाळ्यात (Himachal PPE Kit Scam) भाजपाच्या नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्षाने राजीनामा दिला आहे.
हिमाचल प्रदेशचेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठविला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आरोग्य संचालक अजय गुप्ता यांनी आधीच अटक करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणात भाजपा नेत्यांची नावे घेतली जात होती. यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात काही लोक भाजपाकडे बोट दाखवत आहेत. यामुळे मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी नैतिकतेमुळे राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे.
या घोटाळ्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. यामुळे हे प्रकरण भाजपाशी जोडणे म्हणजे अन्यायकारक आहे. तसेच कोरोनाच्या संकटात भाजपाने केलेल्या समाजसेवेचा अपमान आहे, असेही ते म्हणाले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार
तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय
SBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले
चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली
थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस