पोलिसांच्या ताफ्यात होती, तरी मुख्यमंत्र्यांची कार हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी अडविली! पुढे काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:40 PM2023-03-14T12:40:58+5:302023-03-14T12:45:50+5:30
एका राज्यातील मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानसभेकडे जात असतो. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात २० ते २५ वाहन असतात, या ताफ्यात सगळी आलिशान वाहन असतात.
एका राज्यातील मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानसभेकडे जात असतो. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात २० ते २५ वाहन असतात, या ताफ्यात सगळी आलिशान वाहन असतात. मुख्यमंत्री मात्र एका साध्या आल्टो कारमधून उतरतात. हा कुठल्या चित्रपटातील भाग नाही. तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आज चक्क आल्टो कारमधून प्रवेश केला आहे.
हिमाचल प्रदेशचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू त्यांच्या अल्टो कारमधून विधानसभेत पोहोचले. सखू आमदार असताना त्यांच्या अल्टो कारमधून विधानसभेत यायचे. संपूर्ण ताफा मुख्यमंत्र्यांत्री सखू यांच्या अल्टो कारने निघाला. हिमाचलचे मुख्यमंत्री अल्टो कारमधून विधानसभेत पोहोचल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. अल्टो कार विधानसभा परिसराजवळ येताच पोलिसांनी खासगी क्रमांक पाहून मुख्यमंत्र्यांची कार अडवली. मुख्यमंत्र्यांना अल्टोमध्ये पाहून पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले.
या 25 लोकांना द्यावा लागणार नाही Toll Tax, देशात कुठेही फिरू शकतात; बघा संपूर्ण लिस्ट
मुख्यमंत्र्यांनी नाराज आमदार रवी ठाकूर यांना सोबत बसवून विधानसभेत आणले. मुख्यमंत्री सखू यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून HP ५५ २६२७ ही अल्टो कार आहे. '२००३ साली मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर विकत घेतली होती. त्यावेळी मी अल्टोमधून विधानसभेत गेलो होतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर ते जेव्हाही आमदार होतात तेव्हा ते अल्टो कारनेच विधानसभेत गेले आहेत.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू पहिल्यांदा विधानसभेत आपल्या मंत्र्यांची ओळख करून देतील. त्यानंतर माजी मंत्री मनसा राम यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर विधानसभेच्या सदस्यांची निवेदने असतील. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास जाहीर केला जाईल, ज्यामध्ये संस्था बंद करणे, डॉक्टरांची भरती, रस्त्यांची दुर्दशा आदी विषयांवर उत्तरे मागवली जातील. मुख्यमंत्री १७ मार्चला त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.