Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:51 PM2022-12-08T19:51:15+5:302022-12-08T19:51:54+5:30

Himachal Pradesh Election Result 2022: आयुष शर्माचे वडिल अनिल शर्मा भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले आहेत.

Himachal Pradesh Election Result 2022: Salman Khan's sister's father-in-law and ayush sharmas father wins from Himachal on BJP ticket | Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी

Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी

googlenewsNext


Himachal Pradesh Election Result 2022: आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा विजय झाला आहे, मात्र हिमाचलमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये अभिनेता सलमान खानच्या बहिणीचे सासरेदेखील आहेत.

गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला भाजपचा विजयाचा ट्रेंड कायम असून, हिमाचल प्रदेशमध्येही सत्ताबदलाचा ट्रेंड कायम राहिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाचवर्षांनी आलटून-पालटून भाजप-काँग्रेसचे सरकार येत असते. गेल्या वेळेस भाजपने तर यंदा काँग्रेसने बाजी मारली आहे. 

आयुष शर्माचे वडील विजयी
हिमाचल प्रदेशात काँग्रेसने 40 आणि भाजपाने 25 जागा जिंकल्या आहेत. या निवडणूक निकालाचे सलमान खानशी एक कनेक्शन आहे. सलमान खानची बहिण अर्पिताचे सासरे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष शर्माने हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरुन वडिलांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या तिकीटावर विजयी
आयुष शर्माचे वडिल अनिल शर्मा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. वडिलांच्या विजयाने आनंदीत झालेल्या आयुषने इंस्टाग्राम स्टोरीमधून मतदारांचे आभार मानले. विशेष म्हणजे आयुष राजकीय कुटुंबातून येतो. शर्मा कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हिमाचलच्या राजकारणात सक्रिय आहे.

Web Title: Himachal Pradesh Election Result 2022: Salman Khan's sister's father-in-law and ayush sharmas father wins from Himachal on BJP ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.