मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:53 PM2023-07-13T16:53:30+5:302023-07-13T17:16:07+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती महापुरात वाहून गेल्या, पण ऐतिहासिक मंदिर आपल्या जागेवर ठामपणे उभे.
Temple in Flood: गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्यात फक्त गाड्याच नाही तर मोठमोठ्या इमारतीही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका खास व्हिडिओने सर्वजण चकीत झाले आहेत.
एकीकडे मुसळधार पाऊस आणि पूरामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या मोठ्या इमारती वाहून जात आहेत, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातून वाहणाऱ्या ब्यास नदीत बांधलेले 'पंचवक्त्र मंदिर' महापूरातही आपल्या जागेवर ठामपणे उभे आहे. ब्यास नदी आपल्यासोबत सर्वकाही वाहून घेऊन गेली, पण मंदिरावर याचा काहीही परिणाम झाला नाही. या मंदिराचा व्हिडीओ पाहून नेटकरी प्राचीन बांधकामाचे कौतुक करत असून, तेव्हाच्या आणि आताच्या बांधकामाची तुलनाही करत आहेत.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल:-
Modern Buildings are collapsing.
— Kashmiri Hindu (@BattaKashmiri) July 11, 2023
Modern Bridges are collapsing.
Modern Roads are collapsing.
Centuries Old Temple Standing Tall 🔥 pic.twitter.com/ezCC9RUo1O
हा व्हिडीओ @BattaKashmiri नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून, याला आतापर्यंत हा व्हिडीओ 3 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून 15 हजार नेटकऱ्यांनी लाईक केला आहे. सर्वजण या प्राचिन मंदिराच्या बांधकामाचे कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये मंदिराच्या आजुबाजुच्या इमारती पाण्यात गेलेल्या दिसत आहेत, पण मंदिरावर याचा थोडाही परिणाम झाला नाही. त्या काळातल्या लोकांनी मंदिराची रचना अशी केलीये की, कितीही पाणी आले तरी मंदिरावर याचा परिणाम होणार नाही.