Khalistan Flags: पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशात खलिस्तानची मागणी, विधान भवनाच्या गेटवर लावले खलिस्तानी झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 09:12 AM2022-05-08T09:12:29+5:302022-05-08T09:12:55+5:30

Khalistan Flags: धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेट आणि सुरक्षा भिंतींवर खलिस्तानी समर्थित झेंडे आढळून आले आहेत.

Himachal pradesh news: Khalistan flag on Himachal Pradesh vidhan bhavan gate; | Khalistan Flags: पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशात खलिस्तानची मागणी, विधान भवनाच्या गेटवर लावले खलिस्तानी झेंडे

Khalistan Flags: पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशात खलिस्तानची मागणी, विधान भवनाच्या गेटवर लावले खलिस्तानी झेंडे

Next

धर्मशाळा: भारतात अनेकदा खलिस्तानच्या मागणीसाठी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली होती. पंजाबमध्ये खलिस्थान समर्थिक लोकांकडून अशा घटना घडवल्या जातात. पण, आता पंजाबसोबत तिकडे हिमाचल प्रदेशातही खलिस्थानची मागणी होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा भवनाच्या गेटवर खलिस्थानी झेंडे लावण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज(रविवारी) सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे आढळून आले. हे झेंडे विधानसभेच्या भिंतीला आणि मुख्य गेटला बांधलेले आढळले. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना रात्री उशिरा किंवा रविवारी पहाटे घडली असावी. एसपी कुशल शर्मा यांनी सांगितल्यानुसार, सध्या विधानसभेच्या गेटवरुन हे खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांचे हे कृत्य असू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी विधानसभेच्या गेटवर आणि भिंतीवर हे खलिस्तानचे झेंडे पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. झेंड्यांवर पंजाबी भाषेत खलिस्तान लिहिले होते. आता हिमाचलच्या कांगडामध्ये खलिस्तानींचे झेंडे कसे लावले गेले, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांवर उपस्थित केला जात आहे. विधानसभेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आज याप्रकरणी गुन्हा दाखल होईल.
 

Web Title: Himachal pradesh news: Khalistan flag on Himachal Pradesh vidhan bhavan gate;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.