हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:14 AM2018-11-26T09:14:49+5:302018-11-26T09:20:52+5:30
हिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यामध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून एक खासगी बस कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने अपघात झाला.
नाहन - हिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यामध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून एक खासगी बस कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरमौर येथील रेणुका मार्गावर खाद्री गावाजवळ हा अपघात झाला. ही बस नाहन या ठिकाणी जात होती, बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कठडा तोडून ही बस थेट 40 फूट खाली नदीत कोसळली.
#UPDATE 9 dead & around 50 people injured after the bus lost control and fell into a gorge in Nahan, Sirmaur Dist around 3 pm yesterday. It appears that the accident took place because of the driver’s negligence. Case registered. Investigation underway: Virender Thakur,SP Sirmaur https://t.co/E5O3I12rHQ
— ANI (@ANI) November 25, 2018
अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी असलेल्या पाच जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तेथे बचावकार्य सुरू आहे.
Himachal Pradesh: Nine persons died after a private bus fell in a gorge near Dadahu in Sirmaur. Rescue & relief operations underway. More details awaited. pic.twitter.com/AEghc2m9IX
— ANI (@ANI) November 25, 2018