हिमालयात होणारच होता...
By admin | Published: April 26, 2015 11:52 PM2015-04-26T23:52:50+5:302015-04-26T23:52:50+5:30
हिमालयीन परिसरात मोठा भूकंप होण्याची शक्यता दीर्घकाळापासून होती, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा आहे. वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ हिमालयीन जिआॅलॉजी
नवी दिल्ली : हिमालयीन परिसरात मोठा भूकंप होण्याची शक्यता दीर्घकाळापासून होती, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा आहे. वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ हिमालयीन जिआॅलॉजी या आघाडीच्या संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ या भागातील टेक्टॉनिक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मते टेक्टॉनिक प्लेटस्च्या हालचालींमुळे हा भूकंप झाला आहे.
विविध भूखंडांच्या प्लेटची हालचाल होत असून यामुळे ऊर्जा तयार होत आहे. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा भूकंपाच्या रूपाने बाहेर पडत आहे, असे या संघटनेतील नेपाळ हिमालयतज्ज्ञ डॉ. अजय पॉल म्हणाले.
हिमालयीन भागात गेल्या १५० वर्षांत चार मोठे भूकंप झाले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते कांगडा ते नेपाळ- बिहार भागात दीर्घकाळात भूकंप झाला नव्हता. त्यामुळे हा भाग भूकंपाची बहुतांश शक्यता असणारा होता. जी.बी. पंत हिमालयीन पर्यावरण व विकास संस्थेत दरडी कोसळणे व भूस्खलनाचा अभ्यास करणारा एक स्वतंत्र भाग आहे.