हिमालयाच्या जैवसौंदर्यात २११ नव्या प्रजातींची भर

By admin | Published: October 8, 2015 05:50 AM2015-10-08T05:50:02+5:302015-10-08T05:50:02+5:30

गेल्या सहा वर्षांत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या प्रदेशांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या २११ नव्या प्रजाती गेल्या सहा वर्षांत आढळून आल्याचे ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ने

Himalayan biodiversity contains 211 new species | हिमालयाच्या जैवसौंदर्यात २११ नव्या प्रजातींची भर

हिमालयाच्या जैवसौंदर्यात २११ नव्या प्रजातींची भर

Next

नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षांत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या प्रदेशांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या २११ नव्या प्रजाती गेल्या सहा वर्षांत आढळून आल्याचे ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. या नव्या प्रजातींमध्ये सापासारखे डोके असणारा चालणारा मासा, शिंकणारे माकड, छोटुकला गाणारा पक्षी व एक नितांतसुंदर आॅर्किड फुलाचा समावेश आहे.
‘हिडन हिमालयाज : एशियाज वंडरलॅण्ड’ (हिमालयात दडलेली आशियातील नवलभूमी) या अहवालात ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ म्हणते की, ईशान्य भारत, भुतान, नेपाळ, म्यानमार आणि तिबेटचा दक्षिण भाग एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रांत पसरलेल्या हिमालयाच्या क्षेत्रांत नव्या प्रजातींचा हा जैवखजिना सापडला आहे.
सन २००९ ते २०१४ या काळात सापडलेल्या या नव्या प्रजातींमध्ये वनस्पतींच्या १३३, कणाधारी प्राण्यांच्या ३९, माश्यांच्या २६, जलचरांच्या १०, सरपटणाऱ्या प्राण्याची एक, पक्ष्याची एक आणि सस्तन प्राण्याच्या एका प्रजातीचा समावेश आहे. याआधी याच हिमालयाच्या क्षेत्रांत विज्ञानास ज्ञात नसलेल्या ३५४ नव्या प्रजाती सन १९९८ ते २००८ दरम्यान आढळल्या होत्या. पृथ्वीच्या पाठीवरून सजीवांच्या अनेक प्रजाती विलुप्त होत असताना सुमारे १५ वर्षांच्या काळात एकाच भागात एवढ्या मोठ्या संख्येने नव्या प्रजाती आढळणे मोठे दिलासादायी आहे.
असे असले तरी हिमालयाच्या रसरशीत जीवसृष्टीलाही वातावरण बदलाने मोठा धोका आहे. तसेच लोकसंख्या वाढ, जंगलतोड, अमर्याद गुरचरण, बेकायदा शिकार, वन्यजिवांचा व्यापार, खाणकाम, प्रदूषण आणि जलविद्युत प्रकल्पांची उभारणी यामुळेही येथील अत्यंत नाजूक निसर्ग संतुलनावर ताण वाढत असल्याचेही या अहवालात अधोरेखित केले गेले आहे.
या क्षेत्रातील वन्यजीवांचा जेमतेम २५ टक्के मूळ अधिवास
आता शिल्लक राहिला आहे,
असे नमूद करून अहवाल म्हणतो
की, पर्यावरण ऱ्हासाची पुरेशी
दखल न घेता अनुसरला जाणारा सध्याचाच विकासाचा मार्ग
यापुढेही अनुसरायचा की अधिक शाश्वत व निसर्गस्नेही विकासाची कास धरायची हे सरकारने ठरवायचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काही विस्मयकारी प्रजाती
सापासारखे डोके असणारा नवा मासा. ठिकाण पश्चिम बंगाल. हवेत श्वास घेऊ शकतो, जमिनीवर चार दिवसांपर्यंत राहू शकतो व हल्लेखोराचाही फडशा पाडतो.
नवा पक्षी- ठिपकेदार रेन-बॅबलर. ठिकाण-ईशान्य भारत. छोट्याशा शेपटीसह लांबी १० सेंमी. बाहेरून विटकरी व पोटाकडे पांढरा. आकाराच्या मानाने खूपच मोठ्या आवाजात गातो.
शिंकणारे माकड. ठिकाण म्यानमार. नाकात पावसाचे पाणी गेल्यावर शिंकते. हा त्रास होऊ नये म्हणून पावसात गुडघ्यात डोके घालून बसते.
करड्या निळसर रंगाचा
नवा बेडूक. ठिकाण-अरुणाचल प्रदेश.
लांबी ४७ मिमी.

Web Title: Himalayan biodiversity contains 211 new species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.