हिमांशू रॉय यांची 'ही' डरकाळी बघा... तुम्हीही म्हणाल, 'बंदे मे था दम'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 04:04 PM2018-05-11T16:04:07+5:302018-05-11T16:04:07+5:30
अनेक हायप्रोफाईल केस अगदी समर्थपणे हिमांशू रॉय यांनी हाताळल्या.
मुंबई- डॅशिंग आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येनं संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिमांशू रॉय यांनी केलेलं काम आजही सगळे कौतुकाने सांगत आहेत. अनेक हायप्रोफाईल केस अगदी समर्थपणे हिमांशू रॉय यांनी हाताळल्या. हिमांशू रॉय पोलीस दलात कार्यरत असताना मोठ्या मोठ्या गुन्हेगारांनाचाही थरकाप उडायचा, अशी प्रतिक्रिया आज सगळीकडून ऐकायला येते आहे. काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील त्यांचं एक वक्तव्य सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
'मी असताना मुंबईला हात लावणं कठीणच नाही, तर अशक्य आहे', असं वक्तव्य हिमांशू रॉय यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं. हिमांशू रॉय हे दहशवादविरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी अनेक दहशतवादी संघटनांची माहिती समोर आणली होती. हिमांशू रॉय यांच्या फक्त नावानेच तुरूंगात असलेले आरोपी थरथर कापायचे
हिमांशू रॉय यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात नाशिकमधून केली. नाशिकचे ते त्यावेळी सर्वात तरूण पोलीस अधीक्षक होते. 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१ मध्येही काम केलं. नाशिक शहर पोलीस आयुक्त (२००४-२००७) पदावर कार्यरत होते. 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं. हिमांशू रॉय यांनी सायबर सेलमध्येही काम केलं. राज्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक पद त्यांनी सांभाळलं.