जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:52 PM2020-12-13T12:52:27+5:302020-12-13T13:34:56+5:30

Most Spoken Language in the World : जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश आहे.

hindi dominance increased became the third most spoken language in the world | जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला

जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भारतातहिंदी भाषा ही जास्त बोलली जाते. मात्र आता परदेशातही हिंदी भाषेची चर्चा रंगली आहे. जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील तिसऱ्या क्रमांकांवर हिंदी भाषेचा दबदबा पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश आहे.

इथेनोलॉगच्या अहवालानुसार, जगातील पहिल्या दहा सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी (Hindi) तिसर्‍या क्रमांकावर आहे. या यादीत बंगाली भाषा सातव्या स्थानावर आहे. जगभरातील 63.7 कोटी लोक हिंदी भाषा बोलतात. इथेनोलॉगच्या अहवालानुसार हिंदीसह सर्वाधिक बोलणाऱ्या भाषेत मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ आणि पंजाबी या प्रमुख भाषा बोलल्या जातात. एवढेच नव्हे तर उर्दूचे मूल्यही वाढले आहे. 

जगातील पहिल्या वीस भाषांमध्ये उर्दूचा देखील क्रमांक लागतो. इथॅनोलॉगच्या अहवालात सध्या जगात 7,117 भाषा बोलल्या जातात आणि भारतात 456 भाषा बोलल्या जातात. जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या असलेली लोकं 23 भाषा बोलतात. जर आपण पहिली भाषा नेटिव्ह आणि नॉन-नेटिव्ह स्पीकर्सदृष्टीने पाहिलं तर मूळ भाषा इंग्रजी ही सर्वात मोठी भाषा आहे. भारतीय भाषांमध्ये बंगाली 26.5 कोटी, मराठी 9.5 कोटी, तेलगू 9.3 कोटी, तमिळ 8.4 कोटी आणि पश्चिमी पंजाबी 8.3 कोटी लोक या भाषा बोलतात. 

इंग्रजी जगभरात 126.8 कोटी लोक आणि मेंडरिनला 112 कोटी लोक बोलतात. स्पेनिश आणि फ्रेंच जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. स्पॅनिश 53.8 कोटी आणि फ्रेंच 27.7 कोटी लोक बोलतात. इथनोलॉगच्या रिपोर्टनुसार आशियात 2,294 भाषा, आफ्रिकात 2,144 भाषा, पॅसिफिकमध्ये 1,313 भाषा आणि अमेरिकेत 1,061 भाषा बोलल्या जातात. तर जगभरात 2,926 भाषा अशा आहेत, ज्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: hindi dominance increased became the third most spoken language in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.