डिजिटल जगतात हिंदीला अव्वल स्थान राहील -मोदी
By admin | Published: September 11, 2015 03:55 AM2015-09-11T03:55:16+5:302015-09-11T03:55:16+5:30
येत्या काळात डिजिटल जगतात इंग्रजी, चिनी आणि हिंदी भाषेचे राज्य राहील. हिंदी अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास मोदींनी १० व्या विश्व हिंदी संमेलनाचे उद्घाटन करताना व्यक्त केला.
भोपाळ : येत्या काळात डिजिटल जगतात इंग्रजी, चिनी आणि हिंदी भाषेचे राज्य राहील. हिंदी अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास मोदींनी १० व्या विश्व हिंदी संमेलनाचे उद्घाटन करताना व्यक्त केला. लाल परेड मैदानावरील या संमेलनाला देश- विदेशातील हिंदी साहित्यकांनी गर्दी केली होती. अस्तित्व धोक्यात आलेल्या भाषांच्या संवर्धनाचे आवाहनही त्यांनी केले. भाषा बाजार मोठा असून अनेक कंपन्यांना अॅप्सची निर्मिती करीत त्याचा लाभ घेता येईल. आपण हिंदी विसरलो तर ते देशाचे नुकसान असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चहामुळे शिकलो हिंदी
माझी मातृभाषा हिंदी नव्हे तर गुजराती आहे. मला चांगल्याप्रकारे हिंदी येत नव्हती. लहानपणी चहा विकता विकता मी हिंदी शिकलो. मुंबईत दुधाचा व्यवसाय करणारे उत्तर प्रदेशचे व्यापारी म्हशी खरेदी करण्यासाठी आमच्या गावांमध्ये यायचे. ते म्हशींना वाहनांमधून घेऊन जात.
या व्यापाऱ्यांना चहा विकताना मी त्यांच्याशी बोलता बोलता हिंदी शिकलो.