‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:25 AM2019-01-03T05:25:00+5:302019-01-03T05:25:02+5:30
अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.
राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका मुलाखतीत दिल्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर नव्याने प्रतिक्रिया येत आहेत. मंदिरासाठी कायदा बनवा, अशी मागणी यानिमित्ताने विहिंपने पुन्हा एकदा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, राम मंदिरासाठी वटहुकमाबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केला जाऊ शकतो; पण सरकार आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्व पावले उचलण्यास तयार आहे.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार म्हणाले की, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे स्पष्ट मत आहे की,
हिंदू समाजाकडून दीर्घकाळ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा
मार्ग प्रशस्त करणे हाच यावर तोडगा आहे. ते म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांचे श्रीराम जन्मभूमीसंबंधी वक्तव्य ऐकले. जन्मभूमीचे प्रकरण गेल्या ६९ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. याचे अपील सर्वोच्च न्यायालयात २०११ पासून प्रलंबित आहे. प्रतीक्षेचा हा मोठा काळ आहे. हिंदू समाज दीर्घकाळापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही.