हिंदू महासभा म्हणते, गोडसे देशभक्त व तत्त्वज्ञही

By Admin | Published: February 17, 2016 02:54 AM2016-02-17T02:54:17+5:302016-02-17T02:54:17+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा थोर देशभक्त होता, असा दावा अखिल भारतीय हिंदू महासभेने केला आहे. जेएनयूमधील वादामुळे देशद्रोह

Hindu Mahasabha says, godse patriots and philosophers | हिंदू महासभा म्हणते, गोडसे देशभक्त व तत्त्वज्ञही

हिंदू महासभा म्हणते, गोडसे देशभक्त व तत्त्वज्ञही

googlenewsNext

मीरत : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा थोर देशभक्त होता, असा दावा अखिल भारतीय हिंदू महासभेने केला आहे. जेएनयूमधील वादामुळे देशद्रोह आणि देशभक्तीचा वाद छेडला गेला असतानाच त्यात या विधानाची भर पडली आहे.
गोडसे हा विचारवंत, तत्त्वज्ञ तसेच अभ्यासू लेखक आणि थोर देशभक्त होता. तो तसा होता तसा आहे आणि मानला जाईल, असे महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोककुमार शर्मा यांनी मंगळवारी एका निवेदनात म्हटले.
सध्या एका कटानुसार जेएनयूमधील वादावर चर्चा छेडली गेल्यामुळे मी हे निवेदन जारी केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदू महासभेला कट्टर राष्ट्रवादी संघटना मानले जाते. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्याची पार्श्वभूमीही शर्मा यांनी विशद केली.
हिंदू महासभेने गोडसेचे उदात्तीकरण करणारी विधाने केल्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hindu Mahasabha says, godse patriots and philosophers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.