मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:21 PM2022-12-19T14:21:46+5:302022-12-19T14:34:40+5:30
एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम मुले; तिच्या मृत्यूनंतर सुरू झाला वाद. जाणून घ्या...
एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम असे एकूण चार मुले आहेत. चकित होऊ नका, हे सत्य आहे. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील चानन ब्लॉकमध्ये हे हिंदू-मुस्लिम कुटुंब राहते. या महिलेने यापूर्वी मुस्लिम विवाह केला होता आणि त्यातून तिला दोन मुले झाली. पण, मुस्लिम पतीने तिला घटस्फोट दिल्यानंतर महिलेने ब्राह्मणाशी लग्न केले आणि तिला अजून दोन मुले झाली. अशा प्रकारे सहा जणांच्या कुटुंबात तीन हिंदू आणि तीन मुस्लिम एकत्र राहत होते. प्रत्येकजण आपापल्या परीने धर्म पाळत होता. मात्र मंगळवारी महिलेचाही मृत्यू झाला. यानंतर आजपर्यंत जे लोक एकत्र राहत होते, ते आता आईच्या अंत्यविधीसाठी आमने-सामने आले आहेत.
सुमारे 45 वर्षांपूर्वी मुस्लिम कुटुंबातील रायका खातून या मुलीचे लग्न झाले होते. मुस्लिम पतीकडून तिला मोफिल आणि सोनेलाल नावाची दोन मुले झाली. मात्र नंतर पतीने तिला घटस्फोट दिला. यानंतर तीन राजेंद्र झा नावाच्या हिंदू व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केले. त्यांनाही मुलगा बबलू आणि मुलगी टेट्री झाली. या घरात प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार धार्मिक कार्य करण्याची परवानगी होती. म्हणूनच राजेंद्र झा यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा बनलेल्या रायका नमाज अदा करत होत्या. त्यांची दोन्ही मुलेही नमाज पढत असत. तर राजेंद्र झा आपल्या मुला-मुलीसोबत हिंदू रितीरिवाज करायचे. यावरुन त्यांच्यात कधीच वाद झाला नाही. उलट प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार एकमेकांना सहकार्य करायचे.
पण, आईच्या मृत्यूनंतर वाद सुर झाला. वादाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी दोन्ही पक्षांना खूप समजावून सांगितले, मात्र प्रकरण मिटले नाही. शेवटी एएसपी सय्यद इम्रान मसूद आले. दोन्ही पक्षांना समजावून सांगताना ते म्हणाले की, आता ती महिला तिच्या हिंदू पतीसोबत होती, त्यामुळे अंत्यसंस्कार केले जातील, परंतु मुस्लिम मुलांची इच्छा असेल तर ते त्यांच्या प्रथेनुसार पुढील संस्कार करू शकतात. सरतेशेवटी त्या महिलेचा नवरा हिंदू असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले आणि हिंदू मुलं त्यांच्या रीतिरिवाजानुसार 13वा करतील. दुसरीकडे, मुस्लिम मुलं त्यांच्या प्रथेनुसार 40वी करू शकतात.