आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:44 AM2022-05-27T10:44:38+5:302022-05-27T10:46:49+5:30

परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे."

Hindu organization demands of survey in Ajmer sharif dargah, claiming to have swastika marks on the walls and windows | आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

googlenewsNext


अजमेर येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा, हे पूर्वी मंदिर होते. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने (एएसआय) येथे सर्व्हे करावा, अशी मागणी महाराणा प्रताप सेनेने केली आहे. संघटनेचे राजवर्धन सिंह परमार यांनी दावा केला आहे, की दर्ग्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर हिन्दू धर्माशी संबंधित चिह्न आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून येथे सर्व्हे करण्यात यावा. याच वेळी, दर्ग्याच्या खादिमांच्या समितीने हा दावा फेटाळून लावत, तेथे अशा प्रकारचे कुठलेही चिन्ह नाही, असे म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे."

यावर, महाराणा प्रताप सेनेने केला दावा निराधार असून, दर्ग्यात अशा प्रकारचे कुठलेही चिन्ह नाही. उलट हिंदू आमि मुस्लीम अशा दोन्ही समाज्याचे कोट्यवधी लोक दर्ग्यात येतात, असे खादिम कमिटी अध्यक्ष अंजुमन सय्यद जादगानचे अध्यक्ष मोईन चिश्ती यांनी म्हटले आहे.

मोईन चिश्ती म्हणाले, ‘‘मी संपूर्ण जबाबदारीने बोलत आहे, की दर्ग्यात कुठेही स्वास्तीक चिह्न नाही. हा दर्गा 850 वर्षांपासून आहे. आजवर अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न उपस्थित झालेला नाही. आज देशात पूर्वी कधीही नव्हते, असे विशिष्ट वातावरण तयार झाले आहे.''
 

Web Title: Hindu organization demands of survey in Ajmer sharif dargah, claiming to have swastika marks on the walls and windows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.