सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:11 AM2018-11-05T07:11:20+5:302018-11-05T07:11:36+5:30
अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ‘आता संयम संपत चालला आहे. गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ अशी निर्वाणीची भाषा रा. स्व. संघाने केल्यानंतर आता हिंदू संतांनी सरकारला वेठीस धरले आहे.
गेले दोन दिवस येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारने
यासाठी निर्णायक पाऊल उचलावे, असा एकूण सूर होता.
अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी तर आवाहन न करता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा, असा आदेशच देऊन टाकला. सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन संतांनी केले.
अधिवेशनात भाषण करताना जगद््गुरु रामभद्राचार्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी (पान २ वर)
मशिदीच्या आग्रहाने हिंदूंना असहिष्णू करू नका
मुस्लिमांच्या मदिना शहरात एकही मंदिर नाही. ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन सिटीमध्येही एकही मंदिर नाही. मग अयोध्येतील राम मंदिराशेजारी मशिद उभारण्याचा आग्रह कशासाठी? हिंदू हे जगातील सर्वात
सहिष्णू आहेत.
रामजन्मभूमीवर मशिदीच्या आग्रहाने त्यांना असहिष्णू व्हायला भाग पाडू नका, असे इशारावजा आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. त्या म्हणाल्या की, अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
त्यामुळे आता तेथे मंदिर
बांधणे हा श्रद्धेचा विषय नसून फक्त जमिनीचा वाद आहे. तो न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करून त्यांच्या पक्षाने पूर्वी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्या म्हणाल्या.