हिंदू धर्मात स्त्री-पुरुष भेदभाव नाही तर मग मंदिर प्रवेशासाठी का ? - SC
By admin | Published: April 13, 2016 04:43 PM2016-04-13T16:43:59+5:302016-04-13T17:12:24+5:30
महिलांबाबतच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावताना सांगीतले कि हिंदू हा फक्त हिंदू असतो तर मग मंदिरात प्रवेशासाठी स्त्री-पुरुष असा भेदभाव का?
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - हिंदू धर्मात महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव नाही, हिंदू हा हिंदूच असतो, असे सांगत महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणा-या सबरीमाला मंदिर प्रतिष्ठानच्या अधिका-यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. मंदीराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यापासून कसे रोखले जाऊ शकते असा सवालही न्यायालयाने विचारला आहे.
महाराष्ट्रात महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू असलेला वाद अात्ताशी थंडावलेला असतानाच शेकडो वर्षे जुने असलेल्या केरळमधील सबरीमाला मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश देण्यावरून वाद सुरू झाला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा कायम राखली पाहिजे यावर मंदिर प्रशासन तसेच केरळ सरकारही ठाम आहे. मात्र याच मुद्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रशासनाच्या अधिका-यांना खडसावले. 'हिंदू धर्मात स्त्री-पुरूष असा भेदभाव नाही, मग मंदिर प्रवेशासाठी असा भेदभाव का केला जातो? असा सवाल न्यायालयाने केला.