"हिंदू लग्नापूर्वी दोन-तीन बायका ठेवतात, त्यानंतर...’’, बदरुद्दीन अजमल यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:14 PM2022-12-03T12:14:19+5:302022-12-03T12:20:40+5:30
Badruddin Ajmal: लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल हे वादाच्या बोवऱ्यात सापडले आहेत. हिंदू लग्नापूर्वी दोन तीन बायका ठेवतात असं विधान त्यांनी केलं होतं.
नवी दिल्ली - लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल हे वादाच्या बोवऱ्यात सापडले आहेत. हिंदूलग्नापूर्वी दोन तीन बायका ठेवतात असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता चौफेर टीका होत आहे. या विधानाविरोधात आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या विधानावर टीका केली आहे. तसेच हे भावना दुखावणारं विधान असल्याचं म्हटलं आहे. तर चर्चेत राहण्यासाठी अशी विधानं केली जातात, अशी टीका भाजपा नेते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
एआययूडीएफने लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल म्हणाले की, हिंदू ४० वर्षांपूर्वी दोन तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. ४० वर्षांनंतर मुलं जन्माला घालण्याची क्षमता कुठे राहते. त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला अवलंबून आपल्या मुलांचे विवाह १८ ते २० या वयात लावून दिले पाहिजेत.
#WATCH वो(हिंदु) 40 साल से पहले 2-3 गैरकानूनी तरीके से बीवियां रखते हैं। 40 साल के बाद बच्चा पैदा करने की क्षमता कहां रहती है...उनको मुसलमानों के फॉर्मूले को अपनाकर अपने बच्चों की 18-20 साल की उम्र में शादी करा देनी चाहिए: जनसंख्या वृद्धि पर मौलाना बदरुद्दीन अजमल, AIUDF अध्यक्ष pic.twitter.com/pPZQHttrrv
— ANI_HindiNews (@AHindinews) December 2, 2022
यावेळी बदरुद्दीज अजमल यांनी भाजपावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपा सरकार मुस्लिमांना प्रत्येक ठिकाणी वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार केवळ हिंदूना बळ देण्याचं काम करत आहे. त्यामुळे मुस्लिमांनीही आता मजबूत बनले पाहिजे. बदरुद्दीन अजमल यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या या विधानावर टीकाही होत आहे.